कुकडीच्या पोंधवडी चारीवरून शितोळे उपचारीचे काम सुरू; आ. संजयमामा शिंदे यांच्याकडून वचनाची पूर्ती

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले पोंधवडी चारीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्याने हुलगेवाडी शिवारातून शितोळे वस्तीकडे जाणाऱ्या अपूर्ण चारीच्या कामाचा शुभारंभ दि. ८ जुन रोजी करण्यात आला. या चारी ची लांबी ४४० मीटर असून त्यासाठी सव्वा मीटर व्यासाच्या सिमेंट पाईप वापरण्यात येणार आहे. या चारीचा लाभ हुलगेवाडीतील शेतकऱ्यांना होणार आहे.
कुकडी प्रकल्प डावा कालवा अंतर्गत पोंधवडी चारीचे काम निधी अभावी २००९ पासून रखडलेले होते. सदर चारीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून विहाळ, कोर्टी, गोरेवाडी, हुलगेवाडी, कुस्करवाडी, राजुरी, वीट, अंजनडोह या गावातील नागरिक सातत्याने लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत होते. कॅनॉलचे कामे रखडल्यामुळे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये कुकडीचे पाणी दाखल झालेले नव्हते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी या चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना आपण पाणी देऊ असे वचन दिले होते. या वचनाची पूर्ती २०२३ मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून झाली. पोंधवडी चारीसाठी ९ कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे या चारीवरील सर्व कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शितोळे चारीच्या शुभारंभ प्रसंगी निलकंठ अभंग, देविदास हुलगे, सुभाष अभंग, रुपचंद गावडे, निवृत्ती माने साहेब, पोंधवडी चे सरपंच मनोज कोंडलिंगे, कंपनीचे मॅनेजर दळवी, छगन हुलगे, रघुनाथ वाघमारे, सुनील जाधव, जालिंदर वाघमारे, कारभारी कवचाळे, राजेश येळे, शिवाजी मासाळ, मालोजी पाटील, ऋषिकेश हुलगे, गणेश कवचाळे, सुरेश कवचाळे, संतोष जाधव, सुशांत काळें, प्रदिप हुलगे, नितीन सोलंकर, सचिन वाघमारे, मच्छिंद्र साळवे, मोरवड चे नाळे आणि हुलगेवाडी व शितोळे वस्तीवरील ग्रामस्थ उपस्थित होते.




