
प्रतिनिधी/करमाळा


मांगी (ता. करमाळा) येथील शेतकरी कुटुंबातील आबा अण्णा चव्हाण यांचे दोन दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मांगी येथील स्मशानभूमी मध्ये चव्हाण कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते पर्यावरण पूरक एक वडाचे झाड लावण्यात आले. तसेच येणाऱ्या काळामध्ये एक हजार पर्यावरण पूरक वृक्ष लावण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यासाठी गावातील सुज्ञ नागरिकांनी व सुशिक्षित तरुणांनी यामध्ये सहभागी होउन गावातील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले आहे. येणाऱ्या काळामध्ये गावातील मयत व्यक्तिचे स्मृती प्रित्यर्थ टी गार्ड सहीत अल्पदरामध्ये वृक्ष वाटप केले जाणार आहे. अशी माहिती मांगी येथिल सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांनी दिली.
यावेळी मांगी येथील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



