-->
करमाळाराजकिय

करमाळा तालुक्यातील भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

 

प्रतिनिधी/अलीम शेख

 

भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्राम विकास विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नेरले येथील महेशराजे भोसले यांची निवड करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक निनाद पटवर्धन यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

 

प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने नव्याने सुरू केलेल्या पंचायत राज व ग्रामविकास या विभागाच्या करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व आढावा सोलापूर जिल्हा संयोजक दशरथ काळे, करमाळा तालुका प्रभारी विक्रांत शिंदे, सोलापूर जिल्हा सहसंयोजक अमरजीत साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

करमाळा तालुका भाजपाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. सोलापूर जिल्हा संयोजक दशरथ काळे, जितेंद्र शिंदे, जिल्हा सहसंयोजक व तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे यांनी कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

 

यावेळी पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख निनाद पटवर्धन यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जावे, कुटुंबाचे सर्वेक्षण करावे, प्रत्येक कुटुंबामध्ये कोणी एक संबंधित कोणत्याही योजनेचा लाभार्थी मिळणारच आहे. ज्या लाभार्थ्यांना योजना लागू होते त्यांना ती योजना पंचायत राज च्या माध्यमातुन मिळवून द्यावी.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र व राज्याच्या साधारणता १२०० च्या आसपास योजना आहेत. अनेक योजना नागरिकां पर्यंत पोहोचत नाहीत. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन योजनांची माहिती सांगायची आणि यामधून जे लाभार्थी मिळणार आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा. कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने काम केले तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक समाज बांधवांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प पूर्ण होणार आहे.

 

यावेळी तालुका सहसंयोजक पदी किरण वाळूंजकर, विशाल पाटील, शिवाजी जाधव, दत्तात्रय देशमुख, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, सोनाली क्षिरसागर यांची निवड करण्यात आली.

 

याप्रसंगी करमाळा शहर अध्यक्ष जगदिश आगरवाल, सरचिटणीस शाम सिंधी, नरेंद्रसिंह ठाकुर, नितीन झिंजाडे आदी पदाधिकारी उपस्थीत होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close