-->
करमाळाराजकिय

आमदारकीचे डोहाळे पुरविण्यासाठी चाललेला मकाईचा उठारेठा थांबवून प्रा. रामदास झोळ यांनी गोविंदपर्वच्या बिलाबद्दल बोलावे- गणेश झोळ

 

प्रतिनिधी/करमाळा

 

आमदारकीचे डोहाळे पूरविण्यासाठी मकाई सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या माध्यमातून स्वताला सिद्ध करण्यासाठी व लोकांसमोर येण्यासाठी प्रा. झोळ यांनी चालवलेला उठारेटा थांबवून गोविंद पर्वच्या बिलाबद्दल बोलावे असे मत बागल गटाचे गणेश झोळ यांनी व्यक्त केले आहे. 

 

झोळ यांनी बोलताना सांगितले की, आदिनाथ बिनविरोध करण्याची भाषा करणार्यांनी जनाधार नसलेल्या लोकांना बरोबर घेऊन मकाईची निवडणूक लावण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक जिंकणार नाही माहीत असतानाही फक्त विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून मकाईची निवडणूक लावून बागल गटावर टीका करणे व चर्चेत राहने हा या मागील एकमेव उद्देश आहे.

 

प्रा. झोळ यांना मकाई ची निवडणूक लागताच अचानक स्वताच्या राजकीय स्वार्थासाठी मकाई बद्दल पुतनामावशीचे प्रेम निर्माण झाले आहे. तत्पूर्वी गोंविदपर्व कारखान्यातील शेतकरी, वाहतूकदार, कामगार यांची ऊसबिल, कामगारांचे वेतन, वाहतूकदारांची देनी या बद्दल प्रा. झोळ यांनी आदी बोलायला हवे. ते स्वतःला शेतकऱ्यांचे काळजीवाहू समजत असतील तर उभारणी काळापासून गोविंदपर्वच्या बोर्डात असताना देणी आणि सोलापूर डि.सी.सी. चे कोटय़वधी रूपये थकवून संस्थेपासून पळ काढण्याऐवजी बागलांप्रमाणे प्रायव्हेट प्रॉपर्टी गहाण ठेवून ही देणी देण्याचे कर्तव्य का पार पाडले नाही?

 

ज्यांना वाशिंबे ग्रामपंचायत निवडणूकीत अनामत रक्कम ही राखता आली नाही त्यांनी मकाई साखर कारखान्याबद्दल बोलूच नये. निव्वळ आमदारकीचे डोहाळे लागलेत म्हणून सभासदांची दिशाभूल करु नये. आगामी काळात दिग्विजय भैय्या बागल यांच्या नेतृत्वाखाली मकाई सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल होनार आहे असेही गणेश झोळ यांनी बोलताना सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close