-->
करमाळाविशेषसामाजिक

हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त २१ व २२ मे रोजी करमाळ्यात भरगच्च कार्यक्रम

 

करमाळा/प्रतिनिधी

 

हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त ‘सकल क्षत्रिय राजपुत समाज, करमाळा’ च्या वतीने करमाळा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन रविवार दि. २१ मे व सोमवार दि. २२ मे रोजी करण्यात आले आहे. 

 

रविवार दि. २१ मे रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत करमाळा शहरातील सुतारगल्ली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार दि. २२ मे रोजी सकाळी ८.३० वा. मंगळवार पेठ येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास महा अभिषेक सोहळा होणार आहे. यानंतर सकाळी ९.३० वा. सामाजिक उपक्रमात सहभागी युवकांसाठी लकी ड्रा काढण्यात येणार आहे. यासोबतच दु.१२ ते ३ वाजेपर्यंत सुतारगल्ली येथे महाप्रसाद होणार आहे.

 

याच दिवशी दुपारी ४ वाजता सुतारगल्ली येथून आकर्षक सजावट केलेल्या रथातून महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत विविध नामांकित वाद्यवृंद (बॅंड) सह विविध हालगी ग्रुप, घोडे इत्यादी प्रमुख आकर्षण असणार आहे. तरी करमाळा शहर व परिसरातील सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close