-->
करमाळाराजकिय

कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

 

प्रतिनिधी/अलीम शेख

 

कामगार नेते, हमाल पंचायत चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या ७२ व्या जयंती निमित्त करमाळा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “हमाल भवन” येथे सकाळी ०९ वा. करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी चेअरमन प्रभाकर शिंदे, माजी सभापती किसन शिंदे, संचालक डॉ. हरिदास केवारे, मा. संचालक बाळासाहेब जगदाळे, नायब तहसीलदार सुभाष बदे, जेलर समीर पटेल, गोपाळ बापू सावंत, विठ्ठल आप्पा सावंत, मा. उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, मंडळ अधिकारी दादा ठाकर, मंडळ अधिकारी घुगे, सरपंच भोजराज सुरवसे, चेअरमन सुजित तात्या बागल, चेअरमन दत्तात्रय अडसूळ, ॲड. राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत, पै. सुनील बापू सावंत उपस्थित होते.

यावेळी जयंतीचे औचित्य साधून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुंजकर, डॉ. राहुल कोळेकर, नगरसेवक राजू आव्हाड, खलील मुलाणी, देवा लोंढे, संतोष वाघमोडे, गणेश मुरूमकर यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. या प्रसंगी सोपान बारवकर, गजानन गावडे, बाबुराव खुळे, आयुब शेख, भीमराव लोंढे उपस्थित होते.

गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन या गो शाळेतील गाईंना (जनावरांना) हिरवा चारा चेअरमन मनोज गोडसे, नगरसेवक मनोज राखुंडे, पत्रकार संजय शिंदे, मनसे अध्यक्ष नाना मोरे, संभाजी होनप, ॲड. प्रशांत बागल यांच्या शुभहस्ते वाटण्यात आला असुन यावेळी ॲड. राहुल सावंत, नगरसेवक पप्पू सावंत, माजी नगरसेवक फारूक जमादार, माजी नगरसेवक विजय सुपेकर, संचालक वालचंद रोडगे, माजी संचालक विठ्ठल रासकर, जालिंदर जाधव, निशांत खारगे, सागर परदेशी, मजहर पठाण, बापू नलवडे उपस्थित होते.

 

या प्रसंगी जयंती निमित्त बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, स्व. आण्णांचे सामाजिक कार्य हे दिशादर्शक होते. त्यांच्या कार्याचा वसा व वारसा सावंत कुटुंब सक्षमपणे पुढे नेण्याचे काम करीत आहेत. राजकारणा पेक्षा समाजकार्याला प्राधान्य देणारे सावंत कुटुंब हे स्व. आण्णांच्या कार्यामुळे करमाळा तालुक्यात परिचित आहे.

 

यावेळी विलासराव घुमरे सर, चेअरमन शिवाजी बंडगर सर, जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे, सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, माजी सरपंच नामदेव शेगडे, नगरसेवक प्रशांत ढाळे, नगरसेवक ॲड. नवनाथ राखुंडे, डॉ. संजय कोग्रेकर, देवानंद बागल, अरुण काका जगताप, शशिकांत केकाण, पत्रकार नासीर कबीर, पत्रकार जयंत दळवी, पत्रकार नरेंद्र ठाकूर, पत्रकार सुनील भोसले, मिलिंद फंड सर, राख सर, मा. संचालक प्रकाश झिंजाडे, मदन देवी, डॉ.खोसे, तुषार शिंदे, सरपंच केशव शेळके, अतुल थोरवे, मोरे भाऊसाहेब, सरपंच महेश सोरटे, मा. सरपंच राजेंद्र घाडगे, विश्वास बागल, माजी सरपंच अजित पाटील, मानसिंग खंडागळे, व्यापारी विजय दोशी, नवनाथ सोरटे, अनिल सोळंकी, प्रीतम गादिया, मयूर दोशी, मनोज पितळे, गोरख ढेरे, राजेंद्र काळे, बाळू दळवी, दौलत वाघमोडे, दादा इंदलकर, आझाद शेख उपस्थित होते.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव गोसावी, महादेव कांबळे, राजू कांबळे, अनिल रासकर, संजय गायकवाड, सतीश खंडागळे, सुभाष शेंडगे, मोहम्मद पठाण, विठ्ठल गायकवाड, नागेश उबाळे, पांडुरंग सावंत, मजहर शेख, राजकुमार सुरवसे, बंडू अडसूळ, दादा सुरवसे, शरद वाडेकर, आकाश करकुटे, सागर सामसे, बापू उबाळे आदी जणांनी परीश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close