-->
करमाळाराजकिय

आजिनाथ व मकाई च्या माजी संचालकांसह पोथरेच्या माजी सरपंचाचा भाजपमध्ये प्रवेश

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

पोथरे (ता. करमाळा) येथे भारतीय जनता पार्टीची बुथ सशक्तिकरण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्व मान्य करत बागल गटाचे मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ झिंझाडे यांनी आपल्या समर्थकांसह व शिंदे गटाचे आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलराव शिंदे, पोथरे चे माजी सरपंच विष्णू रंदवे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील, अभिजीतदादा निंबाळकर, संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, लोकसभा प्रवास प्रभारी जयकुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.

 

प्रवेशावेळी बोलताना हरिभाऊ झिंजाडे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. तसेच तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व गणेश चिवटे यांच्या कामाला प्रभावित होऊन मी माझ्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजना गणेश चिवटे यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

 

यावेळी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, भगवानगिरी गोसावी, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, भाजपचे सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, प्रवीण बिनवडे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, मच्छिंद्र हाके, दादासाहेब देवकर, नितीन निकम, बिभीषण गव्हाणे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक धर्मराज नाळे, नितीन झिंझाडे, सोमनाथ घाडगे, किरण शिंदे, मोहन शिंदे, बाळासाहेब होसिंग, संदिपान कानगुडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष राजश्री खाडे, शहर अध्यक्षा संगीता नष्टे, नानासाहेब अनारसे, विनोद महानवर, भैय्याराज गोसावी, अशोक साळुंखे, आजिनाथ सुरवसे, दीपक गायकवाड, संदीप काळे, जयसिंग भोगे, विशाल घाडगे, दादा गाडे, शिवाजी नाळे, हनुमंत रणदिवे, बापु मोहोळकर, आबा चौघुले, अण्णा पडवळे, ईश्वर मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close