-->
करमाळामनोरंजन

आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये १ मे रोजी उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन 

भक्तगणांनी लाभ घेण्याचे वली बाबा दर्गाह ट्रस्ट ने केले आवाहन

करमाळा/प्रतिनिधी

 

बखशी ए हिंद हजरत शेख शरफुद्दिन बु अली शाह कलंदर नोमानी पानिपती रहमतुल्लाह पानिपत यांच्या स्मरणार्थ आवाटी (ता. करमाळा) येथे वली बाबा दर्गाह येथे ७२४ वा उरूस कलंदर चा धार्मिक कार्यक्रम १ मे २०२३ सोमवार उर्दू तारीख १० शव्वाल १४४४ हिजरी सोमवार रोजी मोठ्या उत्साहात भरणार असल्याची माहिती आवाटी येथील हजरत सय्यद वली चांद पाशा दर्गा ट्रस्ट कमिटीने दिली.

 

गेली दोन ते तीन वर्षापूर्वी कोरोना या भयंकर महामारीने राज्य, देश तसेच जगभरात थैमान घातले होते. त्यामुळे आवाटी येथील दर्गाह परिसरातही शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून कोणताही धार्मिक कार्यक्रम राबविला गेला नव्हता. मात्र त्यानंतर ४ वर्षाच्या कालखंडानंतर सध्या उरूस कलंदर चा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

 

उरूस कलंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवार दि. १ मे रोजी दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ हिंदू तसेच मुस्लिम भक्तगण ही मोठ्या संख्येने घेत असतात. धार्मिक कार्यक्रमा बरोबरच दरगाह मध्ये मोफत अन्नदान अर्थात महालगरखाना याचेही आयोजन करण्यात आले आहे.

 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पानिपत येथील शेख शरफुद्दीन बु अली शाह कलंदर पानिपत यांच्या स्मरणार्थ दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर धार्मिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यातून देखील हिंदू-मुस्लीम भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी लावून हिंदू- मुस्लीम एकोपा कायम ठेवतात.

 

सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा. असे आवाहन वली बाबा दर्गा ट्रस्ट कमिटी तसेच आवाटी येथील समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close