-->
करमाळाकृषी विषयक

चिखलठाण येथे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास विषयी प्रशिक्षण

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील चिखलठाण नं. १ येथे कुशल ओपन कॉमर्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास निर्मिती बाबत प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. श्रीकृष्ण जगताप यांनी केले होते. यावेळी कृशल ओपन कॉमर्स चे टीम लीडर अच्युत गोळे व मुरघास तज्ञ श्रीमंत झाकणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 भूमापन दिना दिवशीच भूमी अभिलेख कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार!

तसेच या प्रसंगी कुगाव येथील दुग्ध व्यवसायिक, शेतकरी श्रीकांत बळीराम सरडे यांच्या गाई दगावल्यामुळे त्यांना कृशल ओपन कॉमर्स कंपनीच्या वतीने ५०,०००/- रूपयांचा चेक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

 

यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, शंभूराजे जगताप, अभयसिंहराजे भोसले, चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे, सहयाद्री ऍग्रो डेअरी चे रूट ऑफिसर हेमंत बन, राजेंद्र बारकुंड, सर्व दूध संस्थांचे चेअरमन व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close