करमाळा शहरात प्रथमच नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी थ्रीडी शो

करमाळा/प्रतिनिधी


करमाळा येथील श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये मुलांना थ्रीडी शो दाखवण्यात आला. करमाळा तालुक्यामध्ये प्रथमच असा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी ही उदंड प्रतिसाद दिला.
या शोमध्ये ब्रह्मांड कसे आहे, आपली पृथ्वी कशी निर्माण झाली, चंद्रावर उतरलेले पहिले मानव, आफ्रिकन शार्क, डायनासोर याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना शो द्वारे दाखवण्यात आली. हा शो पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गॉगल मुलांना देण्यात आले होते. नुकतीच परीक्षा पूर्ण झाल्यामुळे मुलांनी या कार्यक्रमाचा भरपूर आनंद लुटला.
यावेळी वाशिंबेकर सर, अग्रवाल सर, पवार सर, ओतारी सर,चिवटे मॅम कोकीळ मॅम, डॉ. भोसले मॅम, अभंग मॅम, बनगर मॅम, गुगळे मॅम, पालक वर्ग ही उपस्थित होते. त्याचबरोबर इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी ही या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी ३०० विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची कल्पना शाळेच्या संचालिका सुनिता देवी मॅडम यांनी सुचवली.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहिते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.




I was very pleased to uncover this web site. I want to to thank you for your time due to this fantastic read!! I definitely appreciated every bit of it and I have you bookmarked to look at new things on your website.