
करमाळा/प्रतिनिधी


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नितीनभाऊ झिंजाडे यांनी दिली आहे.
प्रवेशाबद्दल अधिक बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व आता सर्वसामान्य जनतेने मान्य केले असून त्यांनी जनसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे ही काम केले आहे. सामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये भवितव्य आहे. यामुळे आपण प्रमुख पदाधिकारी यांचेसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
करमाळा तालुक्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे हे आमचे जुने सहकारी असून आम्ही बजरंग दल संघटनेत सोबत काम केलेले आहे. चिवटे यांनी शून्यातून काम उभे केलेले असून ते आज राजकारणा बरोबरच एक यशस्वी उद्योजक ही आहेत. त्यांनी आज भाजप खेड्यापाड्यात नेण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांची तालुक्यातील ताकद आणखी वाढवण्यासाठी आपण चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात पक्षाचे विचार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्ष वाढवण्यासाठी काम करणार आहोत. असेही झिंजाडे यांनी शेवटी सांगितल आहे.



