-->
करमाळादेशराजकिय

भाजपाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम विविध ठिकाणी संपन्न

 

करमाळा/प्रतिनिधी

 

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी ९९ व्या मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील वीट, मोरवड, पिंपळवाडी, रोशेवाडी, हिवरवाडी, देवळाली, खडकेवाडी, गुरसळी, मिरगव्हाण, अर्जुननगर, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव (ह), गौंडरे, शेलगाव (क), सौंदे, विहाळ, वंजारवाडी, करंजे, भालेवाडी, बिटरगाव (श्री), जातेगाव, केम, शेलगाव, वांगी, कुंभारगाव आदी ठिकाणी करण्यात आले होते.

 

या मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँड येथे ७५ वर्षानंतर प्रथमच दोन महिला विधानसभा सदस्य म्हणून निवडणूक जिंकून स्त्री शक्तीची ताकद दाखवली त्याबद्दल अभिनंदन केले. २०१३ साली देशात अवयवदान करणाऱ्यांची संख्या ५००० होती तर २०२२ साली ही संख्या १५००० झाली आहे. या सर्व परिवारांचे मोदी यांनी आभार मानले, तसेच देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.

 

तालुक्यातील विविध ठिकाणी हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close