-->
करमाळाविशेष

खडकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीची शंभर टक्के वसुली

 

करमाळा/प्रतिनिधी

 

खडकी (ता. करमाळा) येथील घरगुती वीज बिलाची वसुली सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीकडून शंभर टक्के करण्यात आली आहे. सिना नदीकाठी वसलेल्या खडकी गावात घरगुती वीज जोडणी ग्राहकाकडून महावितरण कंपनीने शंभर टक्के वीज बिल वसुली करून थकबाकी शून्य केली आहे.

 

महावितरण कंपनीचे विद्यमान वायरमन सुनील विठ्ठल कामटे यांनी ही विज बिल वसूल करण्याचा दुसऱ्यांदा मान पटकावला आहे. हा मान त्यांनी महावितरण कंपनीच्या उपविभागा अंतर्गत दुसऱ्यांदा मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्यावर्षी ही त्यांनी घरगुती विज जोडणी धारकाची थकबाकी शून्य केली होती. यंदाही थकबाकी शून्य केल्याने वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव तसेच शाखा अभियंता सुनील पवार (करमाळा ग्रामीण दोन) यांनी त्यांचा पेढा भरवून श्रीफळ, फेटा देऊन सन्मान केला आहे.

 

या प्रसंगी महावितरण कंपनीचे ग्रामीण एकचे शाखा अभियंता कार्तिक वाघमारे तसेच करमाळा शहर शाखा अभियंता रघुनाथ शिंदे उपस्थित होते. सुनील कामटे यांनी केलेल्या थकबाकी वसुलीचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांचा आदर्श इतर कर्मचार्यानी घ्यावा. असे आवाहन उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव व शाखा अभियंता सुनील पवार यांनी केले आहे.

 

यावेळी ओंकार ढेरे, बिभीषण शेरे, मनोहर साळुंखे, गणेश क्षीरसागर, अजिंक्य साठे, वडगावचे माजी सरपंच बालाजी अंधारे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे शिवशंकर जगदाळे आदि मान्यवर, पदाधिकारी व महावितरण चे कर्मचारी उपस्थित होते. सर्वांचे आभार सुनिल कामटे यांनी मानले.

 

घरगुती वीज जोडणी ग्राहकांना तत्पर दिलेल्या सेवेचे हे फळ असून त्यांच्या सहकार्यामुळेच मार्च महिना अखेर शंभर टक्के वसुली करणे शक्य झाले आहे.

सुनिलकामटे,        वायरमन,खडकी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close