-->
करमाळादेशराजकियराज्य

खा. राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध काँग्रेसचे जेल भरो आंदोलन- सुनील सावंत

सुनिल बापू सावंत यांच्या नेतृत्वात सोमवारी करमाळ्यात काँग्रेसचे 'जेल भरो आंदोलन'

 

करमाळा/प्रतिनिधी

 

काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना गुजरातमधील सुरत न्यायालयाने एका वक्तव्यामुळे दाखल झालेल्या मानहानी खटल्यात २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर करमाळा येथे काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. २७ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जेल भरो आंदोलन करण्यात येणार असुन सर्व काॅग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सुनील बापु सावंत यांनी केले आहे.

 

पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासदार राहुल गांधी यांच्या ‘चोरों का सरनेम मोदी ही क्यों होता है?’ या वक्तव्यावरून त्यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांना केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकार घाबरत आहे. त्यांच्या पायाखालची वाळु घसरत चालली आहे. भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये खा. राहुल गांधी यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप सैरवैर झालेले दिसत आहे. यामुळेच काॅग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारे अडकवण्याचा त्यांचा हा डाव आहे.

 

लोकशाही वाचविण्यासाठी व न्याय व्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व काॅग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता जेल भरो आंदोलनात सामील व्हावे. असे आवाहन काॅग्रेस पक्षाचे युवा नेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे. या निवेदनावर काॅग्रेस पक्षाचे दस्तगीर पठान, फारुक जमादार, औदुबर उबाळे, मझहर नालबंद, संभाजी गायकवाड, राजेन्द्र वीर, सिंकदर सय्यद, राजेन्द्र कसाब आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close