-->
करमाळाविशेषसामाजिक

वाशिंबे रेल्वे स्थानकावर दौंड सोलापूर डेमू गाडीला थांबा देण्यात यावा- गणेश झोळ

 

प्रतिनिधी/वाशिंबे

 

करमाळा तालुक्यातील वाशिंबे रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू झालेल्या दौंड – सोलापूर, सोलापूर दौंड डेमू गाडीला थांबा देण्याची मागणी वाशिंबे येथील गणेश झोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

 

यावेळी झोळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाशिंबे रेल्वे स्थानकावरून सकाळी दौंड, पुणे येथे व संध्याकाळी जेऊर, कुर्डुवाडी, सोलापूर येथे वाशिंबे परिसरातील सोगाव, ऊंदरगाव, गोयेगाव, मांजरगाव, राजूरी, रीटेवाडी येथील नागरीकांना दवाखाना, कोर्ट-कचेरी, शाळा, कॉलेज, खरेदी-विक्री, चाकरमानी यांना जावे लागते. परंतू सध्या या वेळेत स्टेशन वर कुठल्याही गाडीला थांबा नाही. त्यामुळे या परिसरातील नागरीकांना गैरसोईला सामोरे जावे लागते. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाने नव्याने सुरू केलेली सोलापूर ते दौंड व दौंड ते सोलापूर डेमू गाडीला वाशिंबे स्थानकावर थांबा देण्यात आला तर नागरीकांना सोईस्कर होणार आहे.

 

या निवेदनाच्या प्रती जनरल मॅनेजर मध्य रेल्वे मुंबई, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, यांना देण्यात आल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close