-->
करमाळाविशेष

रेल्वेच्या थांब्यासाठी पारेवाडी रेल्वे स्थानकावर भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 

केत्तुर/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे असणाऱ्या पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा. अशी १९९७ पासूनची मागणी येथील नागरीकांची आहे. परंतु, या मागणीला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा केत्तूर परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज शनिवार दि. १८ मार्च रोजी भव्य एल्गार मोर्चा काढून पारेवाडी स्थानकावर आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक, ग्रामस्थ, तरुण व महिला या मोर्चात सहभागी झाले होते.

 

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केत्तूर ग्रामपंचायत कार्यालयापासून हलगीच्या कडकडाटासह टाळ, मृदंग व पखवाज यांच्या गजरात निघालेल्या मोर्चात सर्वच सहभागी झाले होते. त्याबरोबर नेताजी सुभाष विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये जि. प. सदस्या सवितादेवी राजेभोसले, दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ, पं. स. सदस्य नागनाथ लकडे, अजित रणदिवे, तानाजी झोळ (सरपंच वाशिंबे), डॉ. अमोल दुरंदे (सरपंच राजुरी), संतोष वारगड (सरपंच रामवाडी), मनोहर हंडाळ (सरपंच कात्रज), ॲड.सविता शिंदे, हनुमंत पाटील (सरपंच हिंगणी) आर.आर. साखरे, संदीप काळे (वृक्ष प्राधिकरण पुणे), सुहास गलांडे, डॉ. गोरख गुळवे, श्याम सिंधी, नरेंद्र ठाकूर, शिवाजी चाकणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

 

मोर्चा पारेवाडी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मुख्य स्टेशन मास्तर चंद्रशेखर शिरसट यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या प्रसंगी ॲड. अजित विघ्ने, उदयसिंह मोरे पाटील, देवराव नवले, सूर्यकांत पाटील, डॉ. अमोल दुरंदे डॉ. जिनेन्द्र दोभाडा, रामदास झोळ, हरिश्चंद्र खाटमोडे, विजय येडे, विलास कोकणे, अजित रणदिवे, संदीप काळे यांची भाषणे झाली. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.

 

या मोर्चाला जनशक्ती शेतकरी संघटना, प्रहार संघटना, वकील बार असोसिएशन, मेडिकोज गिल्ड असोसिएशन, केत्तूर सर्व व्यापारी बंधू आदी संघटनांनीही उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता.

 

या मोर्चात दत्तात्रय कोकणे, रामराव पाटील, प्रशांत नवले, किरण निंबाळकर, सचिन कनिचे, उदय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, शहाजी पाटील, राजेंद्र कटारिया, राजेंद्र खाटमोडे, बापूसाहेब पाटील, संतोष पाटील, संजय साळवे, सागर खैरे, राजाराम माने, मालोजीराव पाटील, दिलावर मुलानी, लक्ष्मण महानवर, यांचेसह दिपाली डिरे, कीर्ती पानसरे, सारिका कोकणे, कमल गुंजाळ, अशोक साळवे, तानाजी गुंजाळ, मंगल बाटिया, संगीता कटारिया आदी युवक, युवतीं सहभागी झाले होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close