केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील यश जोतिराम वाघमारे आणि साडे येथील श्रावणी अशोक ठाकर या विद्यार्थ्यांची पोखरपूर येथे जवाहर नवोदयसाठी निवड झाली आहे. जवाहर नवोदय साठी निवड झालेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांचा सन्मान करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून या सत्कार समारंभाचे आयोजन राष्ट्रवादी पदवीधरचे तालुका अध्यक्ष रविंद्र वळेकर यांनी केले होते.
निंभोरे येथील यश वाघमारे हा विद्यार्थी जि. प. प्रा. शाळा, वळेकर वस्ती निंभोरे येथे शिकत होता. यश हा अत्यंत सामान्य कुटुंबातील असून त्याने शिकवनी न लावता काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व-अध्ययन करून आपल्या नावाप्रमाणे यश मिळवले आहे. सध्या तो साडे हायस्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. तसेच त्याला जि. प. प्रा. शाळा वळेकर वस्ती येथील शाळेचे शिक्षक पळसे सर, मंगवडे सर व आगलावे सर यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. परंतु, सर्वाधिक श्रेय जाते ते फरतडे वस्ती येथील सह शिक्षक श्री. रामदास काळे सर यांना.
यावेळी आ. संजय मामा शिंदे, राष्ट्रवादी पदवीधर चे तालुका अध्यक्ष रविंद्र वळेकर, लव्हे चे सरपंच विलासदादा पाटील, साडे चे दत्ताभाऊ जाधव तसेच मयूर पाटील तसेच विद्यार्थ्यांचे पालक व प्रविण वळेकर, ज्ञानेश्वर वळेकर, लखन वळेकर, सोमनाथ पासंगराव, दत्ताभाऊ वळेकर, ईश्वर मस्के, नाथाभाऊ शिंदे, अजितदादा वळेकर आदी निंभोरेकर उपस्थित होते.




