
करमाळा/प्रतिनिधी


श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित, नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील हे होते. तसेच शीतल लोंढे, सौ कल्पना चांदगुडे, सौ सुनीता देवी मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
विज्ञान दिनानिमित्त मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तयार केले होते. तसेच विज्ञानाशी संबंधित रांगोळी प्रदर्शन ही भरवण्यात आले होते. मोठ्या संख्येमध्ये मुलांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. मुलांनी बनवलेल्या प्रोजेक्टचे पाहुण्यांनी कौतुक करत मुलांना योग्य मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ. सुनिता मोहिते मॅडम यांनीही विज्ञान जीवनामध्ये कसे महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात गणेश करे पाटील सर यांनी शाळेच्या संचालिका सौ सुनीता देवी मॅडम यांना तालुक्यातील पहिला “शैक्षणिक जीवनगौरव पुरस्कार” जाहीर केला. तसेच शाळेच्या सायन्स लॅब साठी २१०००/- रुपये ची देणगी जाहीर केली. शाळेतील सर्व शिक्षकांचे ही त्यांनी कौतुक केले व सर्व शिक्षकांसाठी मानचिन्ह देण्याचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मीनल बनसोडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ मेघाली शेटे मॅडम यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्ग ही उपस्थित होता. कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कष्ट घेतले.




