
करमाळा/प्रतिनिधी


श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित, नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका सौ सुनिता देवी मॅडम या होत्या.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी कवी कुसुमाग्रजांबद्दल माहिती दिली. तसेच ‘वाचाल तर वाचाल’ या युक्तीचे महत्त्वही पटवून दिले व सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपले लाडके कवी, लेखक, साहित्यकार नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. काही विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिना विषयी भाषणे केली. तसेच काहींनी कुसुमाग्रजांच्या कविता म्हणून दाखवल्या. मराठी भाषेतील व्याकरणावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते, म्हणी, सुविचार यांचेही तक्ते विद्यार्थ्यांनी बनवले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहिते मॅडम यांनीही मुलांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता म्हणून दाखवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अश्विनी क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.




