-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील सर्वात जुना असणारा (३० वर्षांपूर्वी) सीना नदीवर झालेला पोटेगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बांधाऱ्याच्या दुरुस्ती साठी वारंवार मागण्या केल्या जात होत्या. नादुरुस्त असणारा हा बंधारा अतिवृष्टीमुळे निकामी झाला होता. या बंधाऱ्याचा मुख्यत्वेकरून बाळेवाडी, पोथरे, पोटेगाव, निलज आदी गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळत होता. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांपासून या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठत नसल्यामुळे त्याचा फायदा कोणालाही होत नव्हता.

 

आ. संजयमामा शिंदे यांच्या गावभेट दौऱ्या दरम्यान मौजे निलज येथील गावाकरी मंडळींनी सिना नदीवरील पोटेगाव बंधाऱ्याचा प्रश्न उपस्थित केला होता. याची तात्काळ दखल घेत आ. शिंदे यांनी अधीक्षक अभियंता डॉ. ह. तू. धुमाळ मुख्य (विप्र )पुणे यांच्याशी फोनवरून सूचना केल्या.

 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉ. धुमाळ धी. बा. मुख्य अभियंता, धीरज साळे अधीक्षक अभियंता सोलापूर, एम. टी. जाधवर कार्यकारी अभियंता सोलापूर, एस. के. आवताडे उप अभियंता करमाळा या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोटेगाव च्या बांधऱ्याची पहाणी केली. या दुरुस्तीसाठी जवळपास ४ कोटी रुपये निधी ची आवश्यकता आहे. सदर निधीमधून या बंधाऱ्याचे काम मजबूत होईल अशी अपेक्षा या भागातील नागरिक करीत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close