-->
करमाळासामाजिक

मोरवड येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

करमाळा/प्रतिनिधी

 

मोरवड (ता. करमाळा) येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. अशी माहिती शिवजयंती उत्सव समितीच्या संयोजकांनी दिली.

 

रविवार दि. १९ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २१ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये दि. १९ रोजी संध्या. ०९:०० वाजता ह.भ.प. दिगंबर महाराज पवार याचे सुश्राव्य असे कीर्तन होणार आहे. त्यांना संगित साथ देणारे गायक रतन महाराज जावळे (आळंदीकर), अमोल महाराज पाटील (नाशिककर), क्षीकांत महाराज गलांडे, मृदुंगाचार्य, आदिजण असणार आहेत. त्यानंतर दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी सकाळी ०८:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे.

 

दि. २० फेब्रुवारी रोजी संध्या. ७ वाजता यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवव्याख्याते प्रा. रविंद्र दवणे सर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे.

 

दि. २१ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची संध्या. ६ वाजता भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे. मोरवड व पंचक्रोशीतील शिवभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close