-->
करमाळाकृषी विषयक

ठिबक सिंचन अनुदान वाटपात करमाळा तालुका जिल्ह्यात अव्वल- ता.कृषी अधिकारी संजय वाकडे

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याची योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने एकच अर्ज केल्यानंतर सोडत पद्धतीने वेगवेगळे शेतकऱ्यांना त्याच्या अनुदानाचा लाभ प्रोत्साहनपर स्वरूपात मिळत असतो. करमाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आत्तापर्यंत १० कोटी प्रोत्साहनपर निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला असल्याची माहिती करमाळा तालुका कृषी अधिकारी श्री. वाकडे साहेब यांनी दिली.

 

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर श्री बाळासाहेब शिंदे आणि उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी श्री रवींद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडीबीटी योजनेअंतर्गत करमाळा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने ठिबक सिंचन/तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, कांदाचाळ/शेडनेट /संरक्षित शेती, शेततळे अस्तरीकरण, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आदी बाबींवरती प्रोत्साहनपर अनुदान दिले गेले असून ठिबक सिंचनाच्या अनुदान वाटपामध्ये करमाळा तालुका हा जिल्ह्यात अव्वल आहे ही भूषणावह गोष्ट आहे.

 

आत्तापर्यंत करमाळा तालुक्यातील ११०० लाभार्थींना ठिबक सिंचन चे ४ कोटी ६१ लाख अनुदान प्राप्त झालेले असून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३८२ लाभार्थ्यांना ०१ कोटी ९९ लाख, कांदाचाळ/ शेडनेट/संरक्षित अंतर्गत ५५ लाभार्थींना ५१ लाख ३३ हजार, शेततळे अस्तरीकरण अंतर्गत ६७ लाभार्थींना ४५ लाख २५ हजार आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना पूरक अनुदान अंतर्गत ९८८ लाभार्थ्यांना २ कोटी १५ लाख असा एकूण ९ कोटी ७१ लाख ५( हजार रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. कृषी कार्यालयाशी संपर्क साधून या योजनांचा लाभ करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.

-आमदार संजयमामा शिंदे

 

महाडीबीटी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१-२२ अंतर्गत करमाळा तालुक्याला जवळपास १० कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाले असून महाडीबीटी च्या योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजय शिंदे यांनी केले. महाडीबीटी च्या कृषी यांत्रिकरण योजना अनुदान अंतर्गत साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते.

श्री. ज्ञानदेव किसन अवचर यांना १२५०००/- रु ट्रॅक्टर साठी, राजेंद्र कुंडलिक माने यांना ७००००/- रू हायड्रोलिक पलटी नांगर साठी व समाधान सूर्यभान भोगे यांना पाच फुटी रोटावेटर साठी ४२ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. संबंधित शेतकऱ्यांना साहित्याचे वाटप आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, कृषी पर्यवेक्षक काशिनाथ राऊत, कृषी पर्यवेक्षक सुहास पोळके, कृषी पर्यवेक्षक मधुकर मारकड, कृषी सहाय्यक दत्ता वानखेडे, कृषी सहाय्यक बाळू गाडे, कृषी पर्यवेक्षक ज्ञानदेव खाडे, कृषी सहाय्यक गणेश माने, कृषी सहाय्यक नरेंद्र गोफने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close