-->
राज्य

धावती बस पेटली.? मोटर सायकलस्वार गंभीर जखमी तर ४५ प्रवासी सुखरूप बाहेर

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

भरधाव मोटरसायकल बसच्या पुढील चाकाखाली येऊन झालेल्या अपघातात बस व मोटार सायकल पेटली. यात मोटर सायकलस्वार संजय नारायण पवार (४० वर्षे) कन्नड वडारवाडा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. तर बस मधील सर्व ४५ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कन्नड आगारातून वैजापूर साठी एक बस दुपारी रवाना झाली. तर याच दरम्यान येवला तालुक्यातील आंदरसुल या गावातील लग्न आटपून संजय पवार कन्नड येथे जात होते.

 

दरम्यान वैजापूर जवळील रोटेगाव पुलावर साडेचार वाजेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पवार यांची मोटारसायकल बसच्या समोरील चाकाखाली आली. अचानक भरधाव मोटारसायकल बसच्या समोरील चाकाखाली अडकल्याने चालकाने ब्रेक दाबले. मात्र मोटर सायकल चाकाखाली फरफटत गेल्याने पेट्रोल टाकी फुटून मोठा स्फोट झाला. त्यामुळे मोटर सायकल आणि बसच्या समोरच्या बाजूला आग लागली.

 

यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली व प्रवाशांना माहिती देत चालकाने लागलीच बस रिकामी केली. क्षणार्धात बस आणि मोटारसायकल आगीच्या वेढ्यात येऊन खाक झाली. मोटर सायकलस्वार संजय पवार हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू आहेत. या थरारक घटनेमुळे रोटेगाव पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. बस मधील सर्व ४५ प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close