-->
करमाळाविशेषसामाजिक

स्वयंघोषित समितीने आपली थोपटून घेऊ नये; शेलगाव-ढोकरी रस्ता आम्ही स्वखुशीने खुला केला-महेश रोकडे

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

करमाळा तालुक्यातील मौजे वांगी नं.३ या गावाला आम्ही गावठाण साठी ७ एकर जमीन दिली आहे. तसेच उजणी धरणात आमची २ एकर जमीन गेली आहे. राहिलेल्या जमिनीतुन शासनाचे इतर तीन रस्ते आहेत. याचा आम्हाला कसलाही मोबदला मिळाला नाही. शेलगाव (वां) ते ढोकरी या रस्त्याला आम्ही स्व:खुशीने जमिन दिली आहे. तसा अर्ज मा. तहसीलदार साहेब, करमाळा यांचेकडे दि.११ मार्च रोजी दिला आहे. त्यासाठी स्वयंघोषित रस्ता संघर्ष समितीने आपली थोपटून घेऊ नये. असे वक्तव्य प्रतिवादी श्री. महेश रोकडे यांनी केले आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आमच्या स्वतःच्या मालकीच्या वांगी नंबर.३ येथील गट नंबर १३८ मधून आम्ही स्वतःच्या वहिवाटी साठी ठेवलेला रस्ता काही मंडळी राजकीय द्वेषायातून आमचे मालकीच्या शेतातून वांगी नंबर.१, वांगी नंबर.४, बिटरगाव व ढोकरी या गावासाठी घेऊ इच्छित असून त्यांना न जुमानता सर्वसामान्य लोकांची, शेतकरी व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे शेलगाव ते ढोकरी हा रस्ता गावठाण हद्दीतील गटारा पासून आम्ही स्वखुशीने आमच्या मालकीच्या गट नंबर १३८ हद्दीतील अंदाजे ९०० मीटर लांब व १२ फूट रुंद रस्ता शासनाला स्व-खुशीने देण्यास तयार आहे. तसेच पुढील काळात रस्ता रुंदीकरणासाठी जमीन संपादनाचा मोबदला देऊन १२ फुटांपेक्षा जास्त जमीन घेण्यात यावी. अशा आशयाचे पत्र मी मा. तहसीलदार साहेब करमाळा यांचेकडे दिले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close