
करमाळा/प्रतिनिधी


दि. करमाळा अर्बन को-ऑप. बँक लि. करमाळा या बँकेच्या २०२१-२२ ते २०२६-२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा वंदेमातरम शक्तीसेनेचे संस्थापक सुहास घोलप यांचा सर्वसाधारण मतदार संघासाठी तर वंदेमातरम शक्तीसेनेच्या महिला अध्यक्षा नंदिनी घोलप यांचा सर्वसाधारण व महिला प्रतिनिधी या दोन मतदारसंघासाठी निवडणुक अर्ज सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे.
यावेळी भाजपा प्रदेश युवा सचिव दीपक चव्हाण, तालुका संघटन सरचिटणीस शशिकांत पवार, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल वाशिंबेकर, भारिपचे जिल्हा अध्यक्ष शहाजी ठोसर, वंदेमातरम शक्तीसेनेचे सचिव नितीन घोडेगावकर आदी उपस्थित होते.




