
वाशिंबे/प्रतिनिधी


श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिंबे गावचे युवक नेते गणेश भाऊ झोळ व नवयुग कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या प्रसंगी वाशिंबे येथील जिल्हा परिषद शाळेतील २२५ विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय कुलकर्णी, राजाभाऊ जगदाळे, गणेश झोळ, सतिश पवार, जगदीश पवार, अमोल शिंदे, भरत शिंदे, बाळासाहेब शिंदे, संतोष झोळ, सतिश झोळ, सुयोग झोळ, शंकर कांबळे, विकास झोळ आदी ग्रामस्थ ऊपस्थित होते.




