
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील बागल गटाचे युवा नेते, श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. दिग्विजय भैय्या बागल यांच्या ३२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुगांव (ता. करमाळा) चे सुपुत्र तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. धनंजय (दादा) डोंगरे यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुगांव येथे गुरुवार दि. १२ जानेवारी रोजी अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा वि. का. सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. महादेव कोकाटे, कुगांव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच कौशल्यताई लक्ष्मण कामटे, उपसरपंच मन्सूर भैय्या सय्यद, माजी उपसरपंच मा.श्री. इन्नुस भाई सय्यद, मा.श्री. कैलास आप्पा बोंद्रे, ग्रामपंचायत सदस्य ॲड. विजय कोकरे, मा. श्री. उद्धव गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. महादेव अवघडे, उपाध्यक्ष मा.श्री. कृष्णाजी सुळ, जगदंब दूध डेअरी चेअरमन मा.श्री. सचिन गावडे, मा.श्री. नवनाथ (तात्या शेठ) अवघडे, कुगांवचे पोलीस पाटील जालिंदर हराळे, सागर पोरे, किरण हवालदार, प्रगतशील बागातदार मा.श्री. संदीपान कामटे, कुगांवचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. अतुल मारकड- पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मा.श्री. परबत कामटे, सचिन पोरे, आबा कामटे, जैनुद्दीन शेख, कुगांव शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सय्यद सर , उपशिक्षक मारकड सर, येवले सर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते.




