-->
करमाळाविशेष

शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल प्रशाले कडून विद्यार्थिनीचा सत्कार

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम (ता. करमाळा) येथील कु. सम्राज्ञी नितीन तळेकर या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचा प्रशाले कडून गुरुवार दि. ०५ जानेवारी २०२३ रोजी सत्कार करण्यात आला.

 

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ साली झाली होती. या परीक्षेचा निकाल दि. ३ जानेवारी २०२३ रोजी लागला असून यामध्ये सम्राज्ञी नितीन तळेकर या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १७४ वा तर तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक मिळवून ती शिष्यवृत्तीधारक झाली आहे. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर, सदस्य विकास कळसाईत उपस्थित होते.

 

सुयश क्लासेसचे संस्थापक वसंत तळेकर सर यांनी सम्राज्ञी नितीन तळेकर हीचा सत्कार केला. तसेच तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री पवार टी. व्ही सर, श्री. जाधव जी. के. सर, श्री. कोंडलकर पी. डी. सर, नरखेडकर मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक कदम एस. बी सर पर्यवेक्षक सांगवे बी. व्ही सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सम्राज्ञी नितीन तळेकर या विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close