
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


तरडगाव (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांच्या पॅनलच्या सरपंच पदासह सहा जागा विजयी झाल्या होत्या. लोकनियुक्त सरपंच रजनी जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी आज शुक्रवार दि. ६ जानेवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अभिजीत जाधव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून अभिजीत जाधव पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे.
या निवडी वेळी ग्रामपंचायत सदस्य ॲड. श्रीनाथ घाडगे, अनुजा जाधव, ज्योती मोरे, ग्रामसेवक श्री बडे भाऊसाहेब आदि उपस्थित होते. तसेच याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. कन्हेरे साहेब यांनी काम पाहिले.
या निवडीनंतर माजी उपायुक्त प्रभाकर जगदाळे, संतोष जाधव पाटील, विकास चेअरमन सुदाम लेंडवे, तात्यासाहेब जाधव पाटील, रवींद्र जाधव, सुभाष पाटील , शरद नलवडे, नितीन काटे, राजकुमार घाडगे, भिवाजी जाधव यांनी सरपंच रजनी जगदाळे आणि नूतन उपसरपंच अभिजीत जाधव पाटील यांचे अभिनंदन केले आणि त्यांचा सत्कार केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.



