-->
करमाळाराजकिय

वाशिंबे ग्रामपंचायती च्या उपसरपंचपदी अमोल पवार यांची बिनविरोध निवड

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व मकाई सह. कारखान्याचे माजी तज्ञ संचालक श्री. अमोल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर उपसरपंच निवडीचा कार्यक्रम वाशिंबे येथिल ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच श्री. तानाजी बापू झोळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

 

या प्रसंगी उपसरपंच पदासाठी ग्रा. स. अमोल पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. बनसोडे साहेब यांनी काम पाहिले.

 

सदर निवडीवेळी वाशिंबे गावचे नूतन ग्रामपंचायत सदस्य शोभा शहाजी शिंदे, वैशाली विजय पाटील, रुपाली धोंडीराम कळसाईत, प्रिया अजित रणदिवे, तुकाराम डोंबाळे, श्रीहरी टापरे, शिवराज झोळ, ग्रामसेवक गाडेकर भाऊसाहेब व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close