-->
करमाळाक्रीडा

नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये क्रिडा सप्ताह निमित्त आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा येथील श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचालित, नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि. २४ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सर्वेसर्वा सौ. सुनीता देवी मॅडम या होत्या.

 

शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीतील मुलांचे चार ग्रुप करण्यात आले होते. यामध्ये रेड डिफेंडर, येलो स्ट्रायकर, ब्ल्यू चॅलेंजर्स आणि ग्रीन कॉन्करस असे ग्रुप पाडण्यात आले होते. विजयी ग्रुप सौ. देवी मॅडम यांनी घोषित केला. चुरशीच्या सामन्यांमध्ये एलो स्ट्रायकर ग्रुपने आपला विजय प्रस्थापित केला. विजयी ग्रुपला सन्मानचिन्ह तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली. सर्व स्पर्धातील प्रथम विजेत्याला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला ही प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

 

सर्व स्पर्धांचे गुणांकन करण्याचे काम सौ. सविता बागल व सौ. मेघाली शेटे यांनी केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री. पवार सर व श्री. इवरे सर यांनीही आपले योगदान दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता मोहिते मॅडम यांनी विजयी ग्रुपचे अभिनंदन केले तसेच सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा ही दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती काळे यांनी मांडले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close