-->
करमाळाक्रीडा

गजानन सोशल & स्पोर्टस् क्लब आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गजानन संघाने पटकावले प्रथम पारितोषिक

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा येथील जिन मैदान मध्ये रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा आयोजित तालुका अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्रमुख आठ संघांनी सहभाग नोंदवला. यामध्ये करमाळा तालुक्यातील नामांकित संघांना पराभूत करून गजानन क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक तर दहीगाव संघाने द्वितीयतृतीय पारितोषिक मुकद्दरजिद्दी या दोन संघाने संयुक्तिकरित्या पटकावले.

 

यावेळी विजयी संघांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम १००००/- रूपये श्री. भोजराज सुरवसे (सरपंच, भोसे) व श्री. प्रशांत ढाळे (मा. नगराध्यक्ष करमाळा), द्वितीय पारितोषिक रक्कम ५०००/- रुपये श्री. अभिजीत चुंबळकर व श्री. भूषण खुळे तर तृतीय पारितोषिक रक्कम ३०००/- रुपये श्री. जितेश कटारिया (शहराध्यक्ष, भाजपा व्यापार आघाडी करमाळा) यांच्यातर्फे देण्यात आले.

 

प्रथम पारितोषिक विजेत्या गजानन संघाकडून अंतिम सामन्यात खेळताना अनुभवी खेळाडू रोहित परदेशी, अमित बुद्रुक, मिलिंद दामोदर, अविनाश सावंत यांनी चमकदार कामगिरी केली. तसेच संघातील इतर खेळाडूंनी केलेल्या चांगल्या खेळाच्या जोरावर संघाने प्रथम पारितोषिक मिळविले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी कमलेश कदम, समीर सय्यद, बंटी भडंगे, बापू सावंत, शकुर भाई, उमेश सुरवसे, सचिन गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तर समालोचन शाहरुख मुलाणी, अक्षय कांबळे यांनी केले. तसेच पंच म्हणून रितेश कांबळे आणि मयूर कांबळे यांनी काम पाहिले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close