राजेंद्र काशिनाथ चिखले गुणवंत गणित शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संचलित, सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सोलापूर यांचे कडून करमाळा येथील श्री गिरधरदास देवी विद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक श्री. राजेंद्र काशिनाथ चिखले यांना गुणवंत गणित शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, पर्यवेक्षक भांजे साहेब, डॉ. ह. न. जगताप, आदलिंगे सर, सिकंदर नदाफ, सूर्यकांत चोरमले, संजय भस्मे, शिवशरण बिराजदार, किरण परदेशी, भाऊसाहेब आजबे उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री गिरधरदास देवी विद्यालयाचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, सचिव अमोल शेठ संचेती, सौ. सुनीता देवी, चंद्रकांत देवी, विजयकुमार दोशी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी जगताप सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार मिळाल्यानंतर राजेंद्र चिखले सर म्हणाले की, मला लहानपणापासूनच गणित हा विषय आवडीचा होता. मी अत्यंत चांगल्या पद्धतीने गणित शिकवत असल्यामुळे माझ्या वर्गातील आत्तापर्यंत एकही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत गणितात नापास झाला नाही किंवा प्रत्येक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले हेच माझे यश आहे.
गणित विषय अवघड आहे अशी समजूत विद्यार्थ्यांची असते त्यामुळे विद्यार्थी या विषयात अभ्यास करण्यात दुर्लक्ष करतो. उलट पक्षी लक्ष देऊन गणित सोडवली तर गणितासारखा सोपा विषय कोणता नाही. असे चिखले सर यांनी सांगितले.



