
माय मराठी न्यूज नेटवर्क


महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे २७ नोव्हेंबर रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये किमान दोन लाख रुग्णांची तपासणी करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे.
या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, महेश चिवटे, मनीष निकाळजे, शहर प्रमुख मनोज शेजवळ, जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय सावंत, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख साठे, करमाळा उपशहर प्रमुख नागेश गुरव, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, तालुकाप्रमुख मस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले की, “माता सुरक्षित, घर सुरक्षित” या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तीन कोटी महिलांची तपासणी झाली असून या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रात हा उपक्रम राबविला असून आता इतर राज्यात ही हा राबवला जात आहे.
आता एक नवीन ध्येय घेऊन परांडा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी जवळपास ५०० तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत. या शिबिरात जवळपास २०० प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येणार असून त्यात निष्पन्न होणाऱ्या आजारावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर ती महाराष्ट्र शासनाकडून मोफत करून देण्याची तयारी करण्यात आली आहे. चष्मे वाटप, मोफत अपंगांना, दिव्यांगांना साहित्य वाटप आदी उपक्रम घेण्यात येणार असून आदी सर्व सोय करण्यात आली आहे.
या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यासाठी चार जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले असून गावोगावी आरोग्य शिबिराचा प्रचार व नाव नोंदणी सुरू आहे. यापूर्वी अशा प्रकारचे शिबिर गुजरात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती घेण्यात आले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात हे पहिले शिबीर होत असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे, अमोल शिंदे, मनोज शेजवळ, मनीष काळजे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या बैठकीत सोलापूर शहरातील जवळपास २०० महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी भगवे उपकरणे देऊन केला.




