
करमाळा प्रतिनिधी


पिंपरी चिंचवड, विद्यानगर येथील युवा नेतृत्व व समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे युवक नेते श्री संभाजी नाईकनवरे यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. समाजात वाढदिवसासाठी चुकीच्या पद्धतीने केला जाणार अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक उपक्रम राबवून संभाजी अण्णा यांनी आपल्या वाढदिवसािमित्त संवेदनशिल असल्याचं दर्शन घडविले आहे .
अण्णा नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतातच सोबत हळवे सुद्धा आहेत, याचीच प्रचिती म्हणून त्यांनी आपला वाढदिवस डिजे लाऊन, फटाके फोडून किंवा गाजावाजा न करता दापोडी येथे असलेल्या सरस्वती अनाथ आश्रम येथे भेट देऊन तेथील मुलांना दिवाळी फराळाचे वाटप केले. आणि आपला वाढदिवस तेथील मुलांसोबत साजरा केला.
यावेळी रोहन भाऊ नाईकनवरे, अस्लम शेख, प्रवीण सराटे, अक्रम शेख व अनेक कार्यकर्ते तसेच संस्थेचे संस्थापक देविदास सुरवसे उपस्थितीत होते.




