-->
करमाळाविशेष

नवभारत इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा येथील श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज बाल दिनानिमित्त शाळेमध्ये मुलांचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. शाळेच्या संचालिका सौ. सुनिता देवी मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहिते मॅडम यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

 

यावेळी इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी मॅडम यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यात घडलेले काही रोचक प्रसंग मुलांना सांगितले. तसेच त्यांनी मुलांना बाल दिनाच्या शुभेच्छा ही दिल्या. या प्रसंगी सौ. पल्लवी ढाळे यांनीही पंडित नेहरू यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी देशना संचेती हिने केले. तर आभार प्रदर्शन युक्ता लुंकड या विद्यार्थिनीने केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close