-->
करमाळाराजकिय

शिवसेनेला मिळालेल्या “मशाल” चिन्हाचे करमाळ्यात पुजन करुन मिरवणूक

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

शिवसेनेला मिळालेल्या “मशाल” या चिन्हाचे  करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मंदिर येथे शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. मशाल पेटवून छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ आणून शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. या वेळेस शिवसैनिकांबरोबरच महिला व नागरिकांकडून मशाल चिन्हाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

शिवसेना वाचावायचे सोंग घेऊन शिवसेना संपवण्याचा कट रचणाऱ्या चाळीस तोंडी गद्दार रावणांची लंका या धगगधगत्या मशालीने उद्ध्वस्त करु असा निर्धार करमाळा येथील शिवसैनिकांनी केला, यावेळी युवासेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे यांनी  विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

यावेळेस तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, विधानसभा संघटक संजय (नेते) शिंदे , शहरप्रमुख प्रवीण कटारीया, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, युवतीसेना युवा अधिकारी वैष्णवी साखरे,
युवासेना शहर प्रमुख समिर हालवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, शिवसेना उपशहर प्रमुख संजय भालेराव, संतोष गानबोटे, उमेश पवार, माजी उपसरपंच विजय माने, उत्तम हनपुडे, जोतीराम घाडगे, युवसेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, उपजिल्हा युवा अधिकारी मयुर यादव, तालुका उपयुवा अधिकारी समाधान यादव, अतुल सांगडे, सोशल मिडीया समन्वयक अजय साखरे, विनोद पाटील, अभिषेक माने, प्रदीप डौले, तुषार मगर, शिवाजीराव माने, भाऊराव मस्तुद, प्रदीप शिंदे, जयदीप शिंदे, बाळराजे फरतडे, भाऊराव मस्तुद, ओंकार कामटे. आदि शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close