
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील आज सर्व दुर मोठा पाऊस झाला. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने करंजे, हिवरे, पांडे, फिसरे, कोळगाव, आवाटी, गौंडरे, शेलगाव, गुळसडी, जेऊर, करमाळा या भागातील ओढे, नाले ओव्हर फ्लो झाले आहेत.
एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम सुरु आहे, मुरमुचोरी, निकृष्ट काम, व दिरगांई होत असल्याने हे काम वादग्रस्त ठरत आहे. या कंपनीची काम पुर्ण करण्याची मुदत संपुन वर्ष उलटले मात्र अजून देखील काम पुर्ण झालेले नाही. पांडे-फिसरे रोडवर असलेल्या बेंधवड्यावरील पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. पुलाचे स्ट्रक्चर उभारले आहे मात्र मुरुम टाकल्याने या ठिकाणचे वाहुन येणारे पाणी आडल्याने करमाळा व कुर्डूवाडी व परांडा या शहरांना जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्यांवर सहा वाजल्यापासून संपुर्ण वाहतूक ठप्प असल्याने अनेक दुचाकी स्वार, चारचाकी वाहने अडकुन पडले आहेत. अनेक विद्यार्थी शिक्षक व महिला आपल्या चिमुकल्यासह अडकले आहेत. अनेक जण करमाळ्याला परत आले आहेत मात्र कुर्डूवाडी, परांडा व पुर्व भागातील गावातुन करमाळ्याला येणारे शिक्षक बॅंक कर्मचारी, व अन्य प्रवासी अडकुन पडले आहेत. पाच तास झाले तरी पुलावरी पाणी कमी होत नसल्याने नागरिकांचे प्रंचड हाल झाले आहेत.
अनेक तक्रारी असुन देखील गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांकाच्या जिवाशी खेळ करणाऱ्या कंपनीला आमदार, तहसीलदार, बांधकाम विभाग, गुण नियंत्रण कक्ष अभय देत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.



