-->
करमाळाविशेषसामाजिक

वसंत महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत डॉ. हेडगेवार प्रशालेतील विद्यार्थ्यांचे सुयश

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

लोकशिक्षिका लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ, वसंत महोत्सव २०२२ निमित्त शनिवार दि. ०८ ऑक्टोंबर रोजी करमाळा तालुक्यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये करमाळा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण चार हजार पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यातून डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय गौंडरे येथील विद्यार्थिनी कुमारी गायत्री दिनकर अंबारे हिची वक्तृत्व स्पर्धेत निवड झाली. त्यामुळे तिचा यशकल्याणी सेवाभावी संस्थेकडून सुवर्णपदक, प्रशस्तीपत्रक व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. तर हस्ताक्षर स्पर्धेत याच प्रशालेतील कुमारी श्रुती कानिफनाथ हनपुडे हिचाही सुवर्णपदक, प्रशस्तीपत्रक व एक ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच निबंध स्पर्धेतही याच विद्यालयातील श्रुती कानिफनाथ हनपुडे हिचा दुसरे सुवर्णपदक, प्रशस्तीपत्रक व एक ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

या यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक सांगडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश (भाऊ) करे पाटील यांचेही आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close