
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


हिंदुहर्दय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे प्राणप्रिय धनुष्यबाण गोठवण्याचे पाप करणाऱ्या निच औलादींना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल असे रोखठोक प्रतिपादन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.निवडणूक आयोगाकडून शिवसेना चिन्ह तात्पुरते गोठवले असून त्या पार्श्वभूमीवर फरतडे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
यावेळेस अधिक बोलताना फरतडे म्हणाले की खोक्यांच्या व महाशक्तीच्या जोरावर बंड करून शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरून शिवसेना फोडण्याचे व अखंड हिंदुस्थान ची शान असणारे शिवसेना नाव बाळासाहेब ठाकरे यांचे प्राणप्रिय धनुष्यबाण गोठवण्याचे महापाप या एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
स्व बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांना प्रंचड त्रास देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना स्वतः बाळासाहेब यांनी हाकलले होते त्यांना बिकेसी येथील मेळाव्यात आणून शिंदे यांनी बाळासाहेबांवर किती श्रद्धा आहे हे दाखवून दिले बेकायदेशीर करडो रुपय खर्चून आणलेली गर्दी शिंदेचे भाषण सुरु असताना उठुन जात होती. मिडीया ने या गर्दीच्या भावना जाणून घेतल्यानंतर सगळा भांडाफोड झाल्यानंतर शिंदे गटाची पायखालची जमीन सरकली असून आपले अस्तित्व राखायचे असले तर धनुष्यबाण गोडवण्या शिवाय प्रयाय नसल्याने महाशक्तीचा वापर करून हा निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला भाग पाडले असल्याची शंकर महाराष्ट्र च्या मनात आहे .फक्त शिवसैनिकांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला हा निर्णय आवडलेला नाही उलट प्रंचड संताप उसळला असून याचा परिणाम यापुढील निवडणुकीत जनता दाखवून देईल
हिंदुहर्दय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे प्राणप्रिय धनुष्यबाण गोठवण्याचे पाप करणाऱ्या निच औलादींना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल .धनुष्यबाण जरी आज तात्पुरते गोठवले असले तरी बाळासाहेब उध्दव साहेब आदित्य साहेब हेच आमचे चिन्ह असून प्रत्येक निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा शिवसेना व धनुष्यबाण एकत्र दिसतील असा विश्वास देखील फरतडे यांनी व्यक्त केला. भविष्यात शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ ,युवासेना राज्य विस्तारक उत्तम आयवळे शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड,शहरप्रमुख प्रवीण कटारिया,संघटक संजय शिंदे ,महिला आघाडी प्रमुख वर्षाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनातुन युवा सेना भक्कम करणार असल्याचे शंभुराजे फरतडे यांनी सांगीतले.
या निवेदनावर युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे,शहरप्रमुख समीर हालवाई, उपशहरप्रमुख प्रसाद निंबाळकर सोशल मीडिया समन्वयक अजय साखरे,समाधान यादव, अतुल सांगडे दर्शन कुस्कर आदींच्या सह्या आहेत.




