-->
करमाळासामाजिक

माजी मंत्री विजय देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमकी पत्राचा शिवसेनेकडून निषेध

 

करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व सोलापूर जिल्ह्यातील सर्वांना समान न्याय देणार म्हणून ओळखले जाणारे आमदार विजय मालक देशमुख यांना काही अतिरेकी प्रवृत्तीच्या लोकांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याचा करमाळा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला असून या धमकीच्या पत्राची सखोल चौकशी करावी. अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे करमाळा शिवसेनेने केली आहे.

माजी पालकमंत्री विजय मालक देशमुख यांना जिवे मारण्याचे धमकी पत्र मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. आज करमाळा शिवसेनेचे घेण्यात आलेल्या बैठकीत या धमकी पत्राचा जाहीर निषेध करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या बैठकीसाठी सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख देवानंद बागल, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, तालुका प्रमुख राहुल कानगुडे, शिवसेना शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत, उपशहर प्रमुख नागेश गुरव, राजेंद्र काळे, युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड, शिवसेनेचे प्रवक्ते ॲड. शिरीष लोणकर, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे, शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्ष तालुका समन्वयक दीपक पाटणे, रोहित वायबसे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, कुंभेज शाखाप्रमुख मारुती भोसले, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मावळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, पुणे सारख्या सांस्कृतिक शहरात पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या अवलादी तयार होऊ लागले आहेत. अशा प्रवृत्तींना ठेचण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी घेतला आहे. यामुळेच पीपीएफ सारख्या राष्ट्रवादी संघटना सक्रिय झाले आहेत. या सक्रिय संघटनेची पाळेमुळे सोलापूर पर्यंत आले असून देशद्रोहाचे काम करणाऱ्या सोलापूरतील व्यक्तींचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. निश्चितच पीपीएफ च्या कार्यकर्त्याचा या धमकी पत्रात समावेश असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close