-->
क्राईमराज्य

बस चालकाचा निष्काळीपणा बेतला जिवावर; बस स्थानकातच चिरडले प्रवाशाला

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

बस चालकाचा निष्काळजीपणा एका दिव्यांग प्रवाशाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना परभणी बस स्थानकात घडली आहे. चालकाने निष्काळजीपणाने गाडी चालवल्यामुळे बस स्थानकामध्येच गाडीच्या टायरखाली चिरडून दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बस चालकाविरोधात कोतवारी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम गणपती राठोड (वय ४५ वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील बळीराम गणपती राठोड हे परभणी येथे उपचारासाठी आले होते. बस स्थानकामधून बाहेर पडत असताना बस (क्र. एम.एच. ४० वाय ५५४१) अंबाजोगाईवरून नागपूरकडे जाणाऱ्या गाडीचे चालक मारोती कोरडे यांनी गाडी निष्काळजीपणे चालवल्याने बळीराम राठोड हे बसच्या चाकाखाली चिरडले गेले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे राठोड यांचा मृत्यू झाला.

 

याप्रकरणी मृताचे भाऊ धुराजी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून सदरील घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक टी. एस फुलपगार करत आहेत.

 

दरम्यान, मृत बळीराम राठोड यांची पत्नी देखील दिव्यांग असून त्यांच्या परिवारामध्ये इतर सदस्य आहेत. बळीराम राठोड यांच्या निधनामुळे मालेवाडी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.©मटा

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close