-->
करमाळा

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित केम ता. करमाळा येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रशालेत हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

 

हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे. आणि आपण आपल्या जीवनात जास्तीत जास्त हिंदी भाषेचा वापर करावा. असे मत हिंदी विषय विभाग प्रमुख श्री. पी. डी कोंडलकर सरांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. कदम एस. बी सर आणि पर्यवेक्षक श्री. सांगवे बी. व्ही सर यांच्या हस्ते हिंदी विषय शिकवणारे शिक्षक श्री. कोंडलकर पी. डी सर, श्री. जाधव जी. के सर, श्री. घुगे एस. एम सर व कुंभार मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.

 

सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. वाघमारे के. एन सर यांनी हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त करत काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. श्री. जाधव जी. के सर यांनी सर्वांचे आभार मानले.

 

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कदम एस. बी सर आणि पर्यवेक्षक श्री. सांगावे बी. व्ही सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी दिवस कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close