-->
करमाळाराजकिय

कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे, संबंधितावर कारवाई करावी; धाडस संघटनेची निवेदनाव्दारे मागणी

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील कोर्टी ते आवाटी या रस्त्याचे काम सध्या चालू असून सदरील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे. तरी आपण संबंधीत अधिकारी व रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनी ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा धाडस संघटनेच्या वतीने आपले कार्यालयासमोर तीव्र स्वरूपांचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे दिला आहे. सदर निवेदन शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा यांचेकडे देण्यात आले आहे.

 

सदर निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्याच्या कामासाठी जवळपास ७० हजार ब्रास मुरुमाची रॉयल्टी भरली असून सुमारे २ लाख ब्रास मुरूम नेण्यात आलेला आहे. परंतु तो मुरूम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलेला नाही. सदरील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असून यात रस्त्याशी संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनी एन पी इन्फ्रा कंपनी प्रा. लि. पुणे यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून शासनाची फसवणूक करून शासनाच्या निधीचा अपहार केलेला आहे. तसेच या गेल्या महिन्याभरात कंपनीकडून जे रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे त्या सर्व रस्त्यास भेगा पडलेल्या असून रस्ता खचला आहे. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हे पाऊस चालू असताना केले आहे. त्यामुळे हा रस्ता कसा टिकणार व कसा चांगल्या प्रतीचा होणार.

 

रस्त्याच्या डी बी एम च्या खाली डब्ल्यू एम एम व जी एस बी टाकून त्याच्या खाली मुरूम टाकण्याऐवजी माती व शाडू टाकली आहे. त्यामुळे हा रस्ता खचत असून तो अतिशयम निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आलेला आहे. तरी आपण आपले स्तरावरून सदरील प्रकरणाची चौकशी करून रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या व करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनी एन पी इन्फ्रा यांना सदरील रस्ता उचकटून पुन्हा एकदा चांगल्या प्रतीचा रस्ता तयार करण्याच्या सूचना द्याव्यात व त्याचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

 

यावेळी धाडस संघटनेचे करमाळा माढा संपर्क प्रमुख बाळासाहेब कोळी, करमाळा तालुका अध्यक्ष अक्षय शिंदे, करमाळा युवा तालुका अध्यक्ष सूरज धोत्रे, करमाळा शहर अध्यक्ष विशाल माळवे, सदस्य संतोष शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close