
लोणंद/प्रतिनिधी


लोणंद (ता. खंडाळा) येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये कला शाखेत द्वितीय वर्षासाठी शिकत असलेल्या पायल इंद्रजीत जाधव या विद्यार्थिनीने श्री सदगुरु दिनकर बाबा मठ, एकंबे येथे संपन्न झालेल्या २२ व्या जिल्हास्तरीय कॅडेट व सिनीयर मुले व मूली तायक्वाँदो स्पर्धा २०२२ मध्ये ५७ किलो वजन गटातील तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण असेच यश मिळविलेले आहे. या स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी संपन्न झाल्या. यामध्ये तिने कांस्य पदक प्राप्त केलेले आहे. या यशाबद्दल पायल जाधव चे अभिनंदन होत आहे. पायलने तायक्वाँदोच्या अंतर्गत क्युरोगी या प्रकारात तिचा सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादन केले. क्युरोगी मध्ये तिने कांस्य पदक प्राप्त केले. पायलच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांच्या सह शालेय प्रशासन, तिचे कुटुंबिय व नागरिकांनी अभिनंदन केलेले आहे. पायलला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय म्हस्के व रणजित झा (आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले.
या अगोदरच काही दिवसांपूर्वी पायल जाधव ने जयपूर येथे संपन्न झालेल्या युथ गेम कौन्सिल इंडिया ऑल इंडिया तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळविलेली होती.आज पुन्हा एकदा साताऱ्याच्या पावन भूमीत पायल ने यशाला गवसणी घातली आहे.
श्री सदगुरु दिनकर बाबा मठ येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी डॉ. सुनील कोडगुले (अध्यक्ष, सा.जि.अ. तायक्वाँदो असो.), श्री. दिलीप वेलियावेहिल (अध्यक्ष, एकलव्य तायक्वाँदो असो. कोरेगांव), श्री. विजय खंडाईत (उपाध्यक्ष, सा. जि. तायक्वाँदो असो.), श्री. अमोल सावंत (सचिव , एकलव्य तायक्वाँदो असो. कोरेगांव) श्री. संतोष सस्ते (सचिव, सा.जि. अॅ. तायक्वाँदो असो.), श्री. सुमित भंडलकर (आयोजक, एकलव्य तायक्वाँदो असो.), स्पर्धेसाठी लाभलेले पंच, सर्व विजेते, उपविजेता उपस्थित होते.
ही स्पर्धा सातारा जिल्हा ॲमॅच्युअर तायक्वाँदो असोसिएशन व एकलव्य तायक्वाँदो असोसिएशन एकंबे (कोरेगांव) यांच्या वतीने २२ वी जिल्हास्तरीय कॅडेट व सिनीयर मुले व मूली तायक्वाँदो स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात आली होती.



