-->
क्राईमराज्य

धक्कादायक: पिण्यासाठी पाणी मागितले आणि खून करून निघून गेले

 

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

 

पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी दाम्पत्यावर चाकूने वार केले आहेत. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकावून मारेकरी पळून गेले. ही खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुका येथील चिंचोली माळी येथे सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजेदरम्यान घडली आहे.

 

पांडुरंग राऊत (वय ६०) असे मयताचे नाव असून त्यांच्या पत्नी शशिकला (वय ५५) या जखमी आहेत. चिंचोली माळी येथे केज रस्त्यावर त्यांचे घर आहे.

 

सोमवारी (दि. ११ जुलै) सायंकाळी तोंडाला स्कार्फ बांधलेल्या अनोळखी तिघांनी केज येथील दाम्पत्याला दारासमोर येऊन पिण्यासाठी पाणी मागितले. शशिकला त्यांना पाणी देण्यास गेल्या तेव्हा त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. यावेळी पांडुरंग यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावरही वार केले. दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात सोडून घरातील बल्ब काढून घेत मारेकरी पळून गेले.

 

 

केज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी नाकाबंदी केली. मारेकरी चोरटे होते की अन्य कोणी, याचा उशिरापर्यंत उलगडा झाला नव्हता.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close