-->
क्राईमराज्य

धक्कादायक घटना; प्रियकराने केली प्रेयसीची लॉजवर नेऊन गळा चिरून निर्घृण हत्या

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

प्रियकरासोबत लॉजवर गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट- सातारा रस्त्यावरील शितल लॉजवर ही घटना घडली आहे. सकाळी रूमची साफसफाई करण्यास आलेल्या कामगाराने रूमची पाहणी केली असता त्याला बाथरूममध्ये तरूणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला.

 

दिप्ती काटमोडे (वय २४) असं खून झालेल्या तरूणीचं नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी व तिचा प्रियकर दोघे रात्री लॉजवर आले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे रूमची साफसफाई करण्यासाठी लॉजचा कामगार रूम मध्ये आला असता त्याला बाथरूम मध्ये तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिचा गळा चिरून खून केल्याचं समोर आलं आहे. माहिती घेतल्यानंतरच दिप्ती तिच्या मित्रासोबत लॉजवर रात्री आली असल्याचं समजलं, पोलिसांकडून पसार झालेल्या त्या मित्राचा शोध घेतला जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close