
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


गौंडरे (ता. करमाळा) येथील डॉक्टर हेडगेवार माध्यमिक विद्यालय, गौंडरे या प्रशालेने पुन्हा एकदा मागील निकालाची पुनरावृत्ती करत भरघोष यश प्राप्त केले आहे. एसएससी परीक्षा मार्च २०२२ मध्ये डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयात एकूण ६० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व ६० विद्यार्थी भरघोस गुणांनी उत्तीर्ण झालेले असून प्रशालेचा निकाल हा १०० टक्के लागलेला आहे.
या प्रशाले मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी तृप्ती गणेश कदम ९३.८०, द्वितीय क्रमांक कुमारी श्वेता गौतम सांगडे ९१.००%, तृतीय क्रमांक शुभम संतोष कापले ९०.४०%, चतुर्थ क्रमांक कुमारी नम्रता बाळासाहेब जगदाळे ८९.००%, पाचवा क्रमांक आदित्य विष्णू कदम ८८.२० तर सहावा क्रमांक हा विभागून शुभम अशोक हनपुडे, प्रशांत केशव गायकवाड व प्रिया अप्पाराव महाडिक ८८.००% गुण मिळवत हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे २४ विद्यार्थी तर ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिवछत्रपती बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उमराव रणमोडे, सचिव दिनकर दादा सांगडे, डॉक्टर हेडगेवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सांगळे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.




