-->
करमाळाराजकियसामाजिक

“आमदार आपल्या दारी” हा उपक्रम वांगी नं. ३ येथे उत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी/ अंगद भांडवलकर

विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत रावगाव, जातेगाव, चिखलठाण, कंदर, केतुर, कोर्टी, साडे या ठिकाणी राबवलेल्या उपक्रमांमधून जवळपास १२ हजार नागरिकांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. त्यामुळेच करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये वांगी नंबर ३ याठिकाणी ग्रामस्थांच्या मागणीनुसार दिनांक १४ जून २०२२ रोजी आमदार आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वांगी नं.३ येथील शिबिरांमध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रमाणपत्रांचे वाटपही शिबीर स्थळी करण्यात आले.

या शिबिराचा लाभ वांगी नं.१, वांगी नं.२, वांगी नं.३, वांगी नं.४, भिवरवाडी, सांगवी नं.१, सांगवी नं.२, बिटरगाव वांगी, कविटगाव, पांगरे, भाळवणी, ढोकरी या गावांतील नागरिकांना झाला.

‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन मंडळ कृषी अधिकारी बनसोडे साहेब तसेच अव्वल कारकून गोसावी साहेब, सुजित तात्या बागल, माजी पंचायत समिती सदस्य सुहास नाना रोकडे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी दिनकर तात्या रोकडे, पांडुरंग आबा जाधव, संतोष देशमुख, युवराज मामा रोकडे, तात्यामामा सरडे, रोहिदास जाधव, अशोक तकिक, आप्पा आहेरकर, भारत साळुंखे, समाधान देशमुख, अर्जुन तकिक, विजय रोकडे, गणेश तळेकर, मारुती रोकडे, जालिंदर पांढरमिसे हे उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ काका रोकडे, मयुर रोकडे, शुभम रोकडे, नितीन रोकडे, महेश जगताप, गहिनीनाथ शिरसागर, दादा रोकडे, रवी रोकडे, आनंद रोकडे, बंडू सुतार, सोनाज काळे, प्रीतम रोकडे, अनिकेत दूधे, आबा शिंदे, बापूराव शिंदे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close