-->
करमाळाराजकियसामाजिक

विद्यार्थांच्या सोयी साठी मुक्कामी बस सेवा सुरु करा – युवासेनेची मागणी

प्रतिनिधी /ऋषिकेश चव्हाण

कोरोना कालावधीनंतर शाळा सुरु होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुक्कामी बससेवा तात्काळ सुरु कराव्यात आशी आग्रही मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे यांनी करमाळा आगार प्रमुख अश्विनी किरगत यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे .या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, शिक्षण, शेती यांना प्रंचड नुकसान सहन करावे लागले. कोरोना नियंत्रणासाठी सरकारला देखील मोठ्या प्रमाणात खर्च सहन करावा लागला. एस टी महामंडळाला देखील कोरोनाचा प्रचंड मोठा फटका सहन करावा लागला .कोरोनातुन सावरल्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांकडून पुकारलेला संपामुळे एसटीचे चाक पुर्ण पणे तोट्यात रुतुन बसले होते. परंतु कोरोना व संपातुन सावरत एस टी आता पुर्वपदावर येत आहे.

एस टी हिच खरी महाराष्ट्राची व खास करुन ग्रामीण महाराष्ट्राची जिवनवाहिनी आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे.एस टी कर्मचाऱ्यांकडून हे सेवेचं व्रत अंत्यत कष्टाने व प्रामाणिक पणे पार पाडले जात आहे. आत्ता कोरोना नंतर आजपासून पुन्हा नव्याने शाळा सुरु होत आहेत. गाव खेड्यातून सकाळी वाजता करमाळा शहरात खासगी शिकवणी तसेच काॅलेज साठी विद्यार्यांना यावे लागत आहे. त्यांना एसटी शिवाय दुसरा पर्याय नाही.विद्यार्थांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून मुक्कामी गाड्या त्वरित सुरु करणे गरजेचे आहे .कारण दुपारी पाच वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या मुक्कामी गाड्या विद्यार्थ्यांना सुरक्षित पणे घरी पोहचवत असतात व सकाळी पुन्हा वेळेवर शाळेत घेऊन येत असतात, विद्यार्थ्यांबरोबरच जेष्ठ नागरिक, शासकीय कामकाजा साठी येणारे नागरिक, प्रवासी यांची सोय होणार आहे. तरी पुन्हा एकदा मुक्कामी गाड्या सुरु करुन ग्रामीण भागातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, प्रवाशांची सोय कराल अशी अपेक्षा आगार प्रमुख यांच्याकडे व्यक्त केली आहे.

या निवेदनावर युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान यादव, दादासाहेब तनपुरे, युवती अध्यक्ष वैष्णवी साखरे, करण काळे, अतुल सांगडे यांच्या सह्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close